यवतमाळ - कचरा कंत्राटदार काम करत नसल्याने 4 नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील कचरा स्वतः ट्रॅक्टरने उचलून नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर टाकला. यावरून पालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. तसेच, कंत्राटदार आणि नगरसेवक यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.
कचराकोंडीमुळे नागरिक त्रस्त
मागील वर्षभरापासून यवतमाळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच 8 दिवसापूर्वी एका नगरसेविकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा टाकला होता. यानंतर तातडीने पावले उचलून कचऱ्याचा ठेका काढण्यात आला. मात्र, शनिवारी (19 जून) 8 दिवस झाले तरी शहरातील कचरा उचलण्यात न आल्याने नगरसेवक व नागरिक त्रस्त झाले.
नगरसेवकांचा इशारा
शेवटी आज 21, 22, 23, 26, 28 या प्रभागाच्या नगरसेवकांनी स्वः खर्चाने ट्रॅक्टरने कचरा गोळा केला. तो कचरा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून टाकला. शिवाय, तातडीने प्रभागातील कचरा उचलण्यात आला नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी नगरसेवकांनी दिला.
हेही वाचा - पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा... भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे आवाहन