ETV Bharat / state

यवतमाळ: नगरसेवकांनी थेट नगर परिषद आवारात टाकला कचरा - yavatmal marathi news

नगरपरिषद अंतर्गत घनकचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांचे वेतन गेल्या सहा महिन्यापासून थकीत आहे. त्यामुळे या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

यवतमाळ: नगरसेवकांनी थेट नगर परिषद आवारात टाकला कचरा

author img

By

Published : Apr 10, 2021, 8:33 PM IST

यवतमाळ - नगरपरिषद अंतर्गत घनकचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांचे वेतन गेल्या सहा महिन्यापासून थकीत आहे. त्यामुळे या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी बंद झाल्याने आता कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे. याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे या प्रकरणी लक्ष वेधावे म्हणून संतप्त नगरसेवकांनी यांनी थेट नगर परिषद कार्यालयात कचरा टाकला.

यवतमाळ: नगरसेवकांनी थेट नगर परिषद आवारात टाकला कचरा
कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर-
नगरपालिकेमध्ये नवीन कचरा उचलण्याचे कंत्राट काढण्यात यावे यासंदर्भात ठराव घेण्यात आला. हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्याप त्यावर कुठलाच निर्णय घेण्यात न आल्याने शहरातील कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न समोर आला आहे. यातच सफाई कामगारांचे वेतन रखडल्याने पूर्ण गाड्याही बंद आहेत. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा यासाठी नगरसेवक उपोषणाला बसले आहेत.

हेही वाचा- महाराष्ट्रात तुटवडा तर गुजरातेत भाजपकडून रेमडेसिवीरचे निःशुल्क वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.