यवतमाळ - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर 13 टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसाकाठी अडीचशे ते तीनशे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व छोट्या -मोठ्या व्यवसायिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
रोज पाच हजार चाचण्यांचे आदेश
जिल्ह्यातील पुसद, यवतमाळ, दिग्रस, दारव्हा, बाभूळगाव या तालुक्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गृह विलगीकरणात असलेले रुग्ण नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे या तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना गृहविलगीकरणात न ठेवता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच व्यवसायिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दिवसाकाठी 5 हजार चाचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.