ETV Bharat / state

यवतमाळमध्ये 1 कोरोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत १२४ रुग्ण - यवतमाळ कोरोना न्यूज

सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 124 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. यापैकी 99 जण बरे होऊन घरीसुद्धा गेले आहेत.

यवतमाळमध्ये 1 कोरोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत १२४ रुग्ण
author img

By

Published : May 29, 2020, 6:52 PM IST

यवतमाळ - उमरखेड येथे मुंबईवरून आलेली महिला पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25 झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 124 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. यापैकी 99 जण बरे होऊन घरीसुद्धा गेले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेली ही महिला संस्थात्मक विलागीकरण कक्षात भरती होती. मात्र, रात्री तिला वैद्यकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. तिच्या परिवारातील 19 लोकसुद्धा संस्थात्मक विलागीकरण कक्षात भरती होते. मात्र, आता त्यांना जवळच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुंबई, पुणे किंवा इतर रेड झोनमधून जिल्ह्यात आलेल्या लोकांनी पुढील 14 दिवस स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. त्यांनी स्वतः च्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी अत्यंत जबाबदारीने आणि सक्तीने गृह विलगीकरणातच राहावे. सर्व नागरिकांनी आपल्या घरातील 65 वर्षांवरील व्यक्ती आणि 10 वर्षांखालील मुलांची काळजी घ्यावी. सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत जिल्ह्यात कुठेही फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या सूचनांचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.