यवतमाळ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड व सारी रुग्णांना आता आपल्या नातेवाईकांशी मोबाईलवर संवाद साधता येणार आहे. तशी सुविधा कोवीड रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. नातेवाईकांना माहिती पुरविण्याकरिता वैद्यकीय समाजसेवक, अधीक्षक यांची वॉर्डनिहाय नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांसोबत दूरध्वनीवरून बोलणे तसेच रुग्णांची माहिती देण्यात येणार आहे.
एकदा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आयसोलेशन आणि सारी वॉर्डात भरती करण्यात येते. मात्र, त्यानंतर त्याची कुठलीच माहिती मिळत नसल्याची ओरड नातेवाईकांकडून होत होती. त्यामुळे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. कोवीड व सारी रुग्णांसोबत नातेवाईकांचे बोलणे करून देण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी एक तसेच रुग्णांची माहिती प्राप्त करून घेण्याकरिता दुपारी तीन ते पाच ही वेळ ठरवून देण्यात आली आहे. वार्ड क्रमांक 18, 19, 24 आणि 25 मधील रुग्णांच्या माहितीसाठी आणि कोवीड मृत्यूच्या माहितीसाठी 9767360666, 8975040623 हा क्रमांक तर आयसोलेसशन वॉर्डातील रुग्णांच्या माहिती करिता 8482851208, 9404775806 आणि अतिविशेष उपचार रुग्णालयातील रुग्णांच्या माहितीकरिता 94200 21208, 9850406505 तर ताप रुग्ण ओपीडी रुग्णाच्या माहितीकरिता 9923485432 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.