यवतमाळ - जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून दररोज साडेचारशेवर पेशंट पॉझिटिव्ह निघत आहेत. तर दररोज सरासरी 7 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. प्रशासनाला हा मृत्यू दर कमी करण्याचे आव्हान असून आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, पोलीस विभाग आणि महसूल विभागाने एकत्र येऊन कठोर पावले उचलण्याची वेळ जिल्हावार येऊन ठेपली आहे.
तपासण्या सुरू मात्र, खबरदारी नाही
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्याही दुकानदार, व्यवसायिक, लघुउद्योजक यांच्याकडून प्रसार होत असल्याने या सर्वांच्या तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यातून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची यानंतर खबरदारी घेण्यात येत नसल्याने पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढत आहे.
आयसोलेशन वॉर्डावर लक्ष केंद्रित करण्याची गरज
जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 24, 25, 18 आणि 10 यात कोरोनाग्रस्तांना भरती करण्यात येत आहे. याच वार्डात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाने या वॉर्डातील रुग्णांवर लक्ष केंद्रित केले तर मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.
हेही वाचा - धारणी-नेर-करंजी महामार्ग घोषित करण्याची गडकरींकडे मागणी