ETV Bharat / state

जिल्ह्यातील मृत्युदर घसरला; दोन मृत्यू; 98 पॉझिटिव्ह

आज मृत झालेल्या दोन जणांमध्ये महागाव तालुक्यातील 25 आणि दारव्हा तालुक्यातील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आलेल्या 98 जणांमध्ये 63 पुरुष व 35 महिला यांचा समावेश आहे. मागील चार दिवसांपासून कोरोनाबाधित पॉझिटिव्ह आणि मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा आकडाहा कमी झाला.

author img

By

Published : Oct 3, 2020, 12:49 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून सतत ५ ते 10 पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत होता. मात्र, मागील चार दिवसांपासून बधितांच्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे. आज केवळ दोन कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे, तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणातही काही अंशी घट झाली. जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्याने 98 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

आज मृत झालेल्या दोन जणांमध्ये महागाव तालुक्यातील 25 आणि दारव्हा तालुक्यातील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आलेल्या 98 जणांमध्ये 63 पुरुष व 35 महिला यांचा समावेश आहे. मागील चार दिवसांपासून कोरोनाबाधित पॉझिटिव्ह आणि मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा आकडाहा कमी झाला.

सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये 204 अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत. होम आयसोलेसशनमध्ये पाचशेहून अधिक रुग्ण तर आयसोलेशन वॉर्डात 259 जण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 270 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन केले आहे. वैद्यकीय अधिकारी यांचा संप मिटल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचारी ग्रामीण आपली सेवा देणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात तपासणी वाढविल्या जाणार असून कोरोनाची साखळी तोडण्यास प्रयत्न केले जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.