यवतमाळ - राज्यात कॉपीमुक्त अभियान सुरू असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील अभियान फोल ठरत असल्याचे समोर आले आहे. महागाव येथे एका शाळेमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केंद्रावर 246 विद्यार्थी असून चार विद्यार्थी गैरहजर होते. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षांसाठी आम्ही कटिबद्ध असून आमच्या शाळेत असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याची प्रतिक्रिया केंद्रप्रमुखांनी दिली आहे.
उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी रावते आणि पोलीस निरीक्षक यांना तात्काळ नोटीस देण्यात आली आहे. तसेच शाळेवर भरारी पथके वाढवा व पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही दखल घेतली आहे.
आजपासून दहावीच्या पेपरला सुरुवात झाली आहे. मराठीचा आजचा पहिलाच पेपर होता. मात्र, महागाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयांमध्ये कॉपीबहाद्दरांचा सुळसुळट दिसून आला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नातेवाईक, मित्र शाळेच्या भिंतीवरून खिडकीच्या आत कॉपी पुरवित असल्याचा समोर आले आहे. या परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असूनसुद्धा असा प्रकार होत असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तसेच शिक्षण विभागाच्या घटित करणाऱ्यात आलेले भरारी पथके नेमके काय करतात, असा प्रश्नसुद्धा पालक उपस्थित करत आहेत.
शिवाय आजचा पेपर हा व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील इतर खासगी अनुदानित शाळेचे केंद्र राजकीय पदाधिकाऱ्यांची असल्याने या शाळेवर कॉफ़ीसारखा प्रकार सुरू असूनसुद्धा शिक्षण विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.
हेही वाचा -
दिल्ली हिंसाचार : मृतांची संख्या ४८ वर, जीटीबी रुग्णालयातील आकिबने घेतला अखेरचा श्वास..
एजीआर : टाटाचे २ हजार कोटी तर व्होडाफोनकडून ३,०४३ कोटी सरकारकडे जमा