यवतमाळ - जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या 334 ने जास्त आहे. जिल्ह्यात 679 जण पॉझिटिव्ह आले असून 1013 जण कोरोनामुक्त झाले. तसेच आठ मृत्युची नोंद आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाच, डेडीकेटेड कोव्हीड सेंटरमध्ये एक आणि खाजगी रुग्णालयातील दोन मृत्यू आहेत.
5822 रुग्ण ॲक्टीव्ह
सद्यस्थितीत जिल्ह्यात 5822 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2472 तर गृह विलगीकरणात 3350 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 65817 झाली आहे. 24 तासात 1013 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 58418 आहे. जिल्ह्यात एकूण 1577 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.92, मृत्युदर 2.40 आहे.
साडेतीन लाख नागरीकांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत 338788 जणांचे लसीकरण करण्यात आले असून यात कोव्हीशिल्ड लस घेणारे 293151 जण तर कोव्हॅक्सीन लस घेणारे 45637 जणांचा समावेश आहे. तसेच बुधवारी जिल्ह्यात 5458 जणांना लस देण्यात आली.
हेही वाचा - यवतमाळ : जिल्हा स्त्री रूग्णालयातील कोविड हॉस्पिटल लवकरच होणार सुरू