ETV Bharat / state

यवतमाळ : महागाईविरोधात काँग्रेसचे 'सायकल रॅली' काढून आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी - यवतमाळ महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

महागाईविरोधात आज जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज सायकल रॅली काढून निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

yavatmal latest news
यवतमाळ : महागाईविरोधात काँग्रेसचे 'सायकल रॅली' काढून आंदोलन
author img

By

Published : Jul 10, 2021, 8:58 PM IST

यवतमाळ - मोदी सरकारच्या मागील सात वर्षाच्या काळात पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर दिवसागणिक वाढत चालले आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत आहेत. त्यामुळे या महागाईविरोधात आज जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज सायकल रॅली काढून निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

प्रतिक्रिया

'काँग्रेसच्या काळात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते' -

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सामान्य नागरिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा स्थितीत केंद्रशासनाने महागाई आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. मात्र, महागाई वाढत असल्याने सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी मनस्ताप देण्याचे काम हे मोदी सरकार करत असल्याचा आरोप कॉंग्रेच्यावतीने करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या काळात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. जगात सर्वाधिक इंधन कर मोदी शासनाच्या काळात भारतात असून यावर वेळीच पावले उचलण्याची गरज आहे, असेही काँग्रेसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, आज महागाईविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - भास्कर जाधवांना अध्यक्षपदाचे वेध, महाविकास आघाडीत कलह?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.