ETV Bharat / state

नुकसान भरपाईसाठी काँग्रेसचे पांढरकवडा येथे धरणे आंदोलन

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यात जवळपास दीड लाख हेक्‍टरवर सोयाबीन, कापूस, तूर यांचे नुकसान झाले आहे. तर, पांढरकवडा तालुक्यामध्ये 40 हजार हेक्‍टरवर नुकसान आकडा गेला आहे.

काँग्रेसचे पांढरकवडा येथे धरणे आंदोलन
author img

By

Published : Nov 9, 2019, 12:24 PM IST

यवतमाळ - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक हातातून गेले असून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी पांढरकवडा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे पांढरकवडा येथे धरणे आंदोलन

हेही वाचा - काळजीवाहू’ सरकार फक्त ‘वर्षा’वरच; भाजपने ही संधी दवडू नये - उद्धव ठाकरे

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यात जवळपास दीड लाख हेक्‍टरवर सोयाबीन, कापूस, तूर यांचे नुकसान झाले आहे. तर, पांढरकवडा तालुक्यामध्ये 40 हजार हेक्‍टरवर नुकसान आकडा गेला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन शासनाने कापसाला प्रति हेक्‍टरी 80 हजार रुपये, सोयाबीनला 50 हजार, तूर व फळ पिकांना 60 हजार रुपये देण्याची मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली.

तसेच पीक विमा देताना ऑनलाईन व ऑफलाईन गुंतागुंतीची प्रक्रिया न ठेवता कोणत्याही अटी व शर्ती विना पीक विमा देण्यात यावा, सीसीआयद्वारे कापूस खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी, नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी करावी, 12 शेतकऱ्यांच्या शेतीला वीज पुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे देण्यात आले.

हेही वाचा - 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे देशात 1992 सारखी परिस्थिती उद्भवणार नाही'

यावेळी आर्नी-चंद्रपूर मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज भोयर यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:Body:यवतमाळ : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक हातातून गेले असून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी पांढरकवडा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे जील्ह्यातील 16 तालुक्यात जवळपास दीड लाख हेक्‍टरवर सोयाबीन, कापूस, तूर यांचे नुकसान झाले आहे. तर पांढरकवडा तालुक्यामध्ये 40 हजार हेक्‍टरवर नुकसान आकडा गेला आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन शासनाने कापसाला प्रति हेक्‍टरी 80 हजार रुपये, सोयाबीनला 50 हजार, तूर व फळ पिकांना 60 हजार रुपये देण्याची मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली. तसेच पिकविमा देताना ऑनलाईन व ऑफलाईन गुंतागुंतीची प्रक्रिया न ठेवता कोणत्याही अटी व शर्ती विना पिक विमा देण्यात यावा, सीसीआय द्वारे कापूस खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी, नाफेड द्वारे सोयाबीन खरेदी करावी, 12 शेतकऱ्यांच्या शेतीला वीज पुरवठा करण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे देण्यात आले. यावेळी आर्नी-चंद्रपूर मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज भोयर यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

बाईट -ऍड. शिवाजीराव मोघे, माजी सामाजिक न्यायमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.