ETV Bharat / state

यवतमाळ : कोरोना जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर - yavatmal collector on the road for corona awareness

कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन, नागरिक मास्क लावतात की नाही याची पाहणी केली. स्थानिक बसस्थानक चौकात उभे राहात जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली.

Collector on the road for corona awareness in Yavatmal
यवतमाळ : कोरोना जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर
author img

By

Published : Feb 20, 2021, 4:19 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोके वर काढण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन, नागरिक मास्क लावतात की नाही याची पाहणी केली. स्थानिक बसस्थानक चौकात उभे राहात जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणार्‍यांना दंडही केला.

जिल्हाधिकारी रस्त्यावर

शुक्रवार मध्यरात्रीपासून संचारबंदी -

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यवतमाळ शहरासह, पांढरकवडा तसेच पुसद परिसरात रुग्ण संख्येचा आलेख वाढता आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून संचारबंदीच्या आदेशाची अमंलबजावणी सुरु होणार आहे. त्यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरत परिस्थितीचा आढावा घेतला. विना मास्क फिरणार्‍या नागरिकांना मास्क लावण्याची विनंती करत दंड ठोठावण्यात आला. कोरोना कमी करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर अत्यंत आवश्यक आहे. अनेक ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसत आहे. बाजारापेठेत सर्रासपणे नागरिकांचा विनामास्कचा वावर सुरु आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी स्वत: रस्त्यावर उतरले होते.

बसस्थानक चौकात भेट -

जिल्हाधिकार्‍यांनी बसस्थानक चौकात आकस्मिक भेट दिली. जिल्हाधिकारीच रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू होणार असल्याने आता बाजारपेठेची वेळ रात्री 8 पर्यंत करण्यात आली आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र येण्यावर बंदी आहे.

हेही वाचा - मुंंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच, आज 823 कोरोनाबाधितांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.