यवतमाळ - मागच्या वर्षी कापूस खरेदीच्या वेळेस कोरोनाचे संकट आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी ही जून महिन्यापर्यंत चालली. यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरूवातीपासूनच पावले उचलली. जिल्ह्यात सात केंद्रांवर सीसीआय (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) अंतर्गत कापूस खरेदी सुरु करण्यात आली आहे. सीसीआयकडून कापसाला हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कापसाचे 60 टक्के उत्पादन होणार- कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी कापूस खरेदीला विलंब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. डिजिटल पद्धतीने कापसाची नोंदणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, कापूस खरेदी सुरु झाली तरी गाड्यांची आवक कमी असल्याचे दिसून येत आहे. यावेळी गुलाबी बोंडअळी आणि परतीच्या पावसाने कापसाचे उत्पादन घटले आहे. यावर्षी हे उत्पादन केवळ 60 टक्के इतके होईल. असा कृषी विभागाचा अंदाज आहे. शिवाय कापूस खरेदीला विलंब झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपला कापूस व्यापाऱ्यांना आधीच विकला आहे. त्यामुळे कापसाच्या गाड्यांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
हे आहेत सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र-