ETV Bharat / state

यवतमाळमध्ये साडेचार हजाराची लाच घेताना वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - arrested

फर्निचरचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने शिरोली येथील सागवान झाडांच्या खरेदीचा सौदा केला होता. या झाडांचे पासिंग करून प्रमाणपत्र देण्याकरता फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गुजर यांनी २०० रुपये घनमीटर प्रमाणे २३.५  घनमीटर सागवान झाडांची ४ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली होती.

यवतमाळमध्ये साडेचार हजाराची लाच घेताना वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
author img

By

Published : Apr 26, 2019, 12:07 PM IST

यवतमाळ - फर्निचरचा व्यवसाय करणाऱया व्यक्तीस फिरत्या पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱयाने (आरएफओ) साडेचार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. २५ एप्रिलला रात्रीच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांला रक्कम स्वीकारताना सापळा रचून रंगेहात ताब्यात घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गुजर असे या आरोपीचे नाव आहे.

फर्निचरचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने शिरोली येथील सागवान झाडांच्या खरेदीचा सौदा केला होता. या झाडांचे पासिंग करून प्रमाणपत्र देण्याकरता फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गुजर यांनी २०० रुपये घनमीटर प्रमाणे २३.५ घनमीटर सागवान झाडांची ४ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून केली त्यानंतर २५ एप्रिलला पांढरकवडा येथील बसस्थानक परिसरात सापळा रचून परिक्षेत्र अधिकारी महेश गुजर याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्यूरो गजेंद्र क्षीरसागर, सुरेंद्र जगदाळे, भारत चिरडे, अनिल राजकुमार, किरण खेडकर, विजय अजमिरे, महेश वाकोडे, राहुल गेडाम यांनी केली.

Intro:आरएफओला साडेचार हजाराची लाच घेताना अटक; एसीबी ची कारवाई
Body:
यवतमाळ : फर्निचरचा व्यवसाय करणाच्या व्यक्तीस फिरत्या पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिका-याने (आरएफओ) साडेचार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. 25 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रक्कम स्वीकारताना सापळा रचून रंगेहात ताब्यात घेन्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गुजर असे आरोपीचे नाव आहे.

फर्निचरचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने शिरोली येथील सागवान झाडांच्या खरेदीचा सौदा केला होता. या झाडांची पासिंग करून प्रमाणपत्र देण्याकरिता फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गुजर यांनी 200 रुपये घनमीटर प्रमाणे 23.5 घनमीटर सागवान झाडांची 4 हजार 600 रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून 25 एप्रिल रोजी पांढरकवडा येथील बसस्थानक परिसरात सापळा रचून परिक्षेत्र अधिकारी महेश गुजर यास रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अँटी करप्शन ब्यूरो गजेंद्र क्षीरसागर, सुरेंद्र जगदाळे, भारत चिरडे, अनिल राजकुमार, किरण खेडकर, विजय अजमिरे, महेश वाकोडे, राहुल गेडाम यांनी केलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.