यवतमाळ - शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करेल. या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफीचा आकडा वाढवून 2 लाखांपर्यंत केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे कॅबिनेट मंत्री संजय राठोड म्हणाले आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री राठोड यांचे पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मंत्री राठोड म्हणाले, यवतमाळ येथील स्थानिक स्वराज्य संस्था या विधान परिषदेवर शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. याचप्रमाणे याठिकाणी रिक्त झालेल्या विधान परिषदेसाठी शिवसेना या पक्षाकडूनच उमेदवार उभा राहील, असेही राठोड यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांची पेढे तुलाही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - 'ओवेसीला उलटं लटकवून दाढी कापेन'