ETV Bharat / state

नववधूने प्रियकरासह रचला नवरदेवाच्या हत्येचा कट, कोल्डड्रिंकमधून दिले विष, बघा सीसीटीव्ही फुटेज - bride husband to assassinate the bride

प्रियकराच्या मदतीनेच रचला नववधूने नवरदेवाच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. या बाबत नववधूने पोलिसांसमोर कबुली दिली आहे.

bride plotted to kill the husband with the help of her lover
प्रियकराच्या मदतीनेच रचला नववधूने नवरदेवाच्या हत्येचा कट; मुलीची पोलिसांसमोर कबुली
author img

By

Published : May 5, 2021, 7:25 PM IST

Updated : May 6, 2021, 1:55 PM IST

यवतमाळ - लग्नाच्या चार दिवसाआधी होणाऱ्या नवऱ्याला शितपेयातून विष खुद्द भावी पत्नीनेच दिल्याची धक्कादायक घटना नेर येथे सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली. प्रेमसंबंधात अडसर ठरल्यामुळे प्रियकराच्या मदतीने नववधूने नवरदेवाच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक कबुली नववधूने नेर पोलिसांना दिली आहे. यावरून तालुक्यातील सोनवाढोना येथील एका युवकाला नेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रियकराच्या मदतीनेच रचला नववधूने नवरदेवाच्या हत्येचा कट; मुलीची पोलिसांसमोर कबुली

चार दिवसाआधी बोलावले आइस्क्रीम पार्लरमध्ये -

नेर तालुक्यातील कोहळा येथील २२ वर्षीय तरुणाला बाभुळगाव तालुक्यातील जांभुळणी येथील त्याच्या भावी पत्नीने लग्नाच्या चार दिवसाआधी आइस्क्रीम पार्लरमध्ये बोलावून शीतपेयामध्ये विष पाजले होते. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावरून नेर पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, हत्येचा कट रचणे या सारखे गंभीर गुन्हे त्या नववधू आणि तिच्या दोन भावासह बहिणीवर दाखल केले आहेत. पोलिसांसमोर सदर मुलीने हा सर्व घटनाक्रम सांगितला. तिच्या सोनवाढोना येथील प्रियकरानेच नववधूला होणाऱ्या नवऱ्याला हे विष देण्यास सांगितले असल्याची धक्कादायक कबुली त्या मुलीने पोलिसांसमोर दिली.

लग्न होऊ नये म्हणून रचला कट -

आरोपी नववधू्चे लग्न हे घरच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या साक्षीने फिर्यादी मुलगा 'किशोर' बरोबर ठरले होते. हेच त्या नववधूच्या प्रियकराला खटकले. त्यामुळे ठरलेले लग्न होऊ नये म्हणून नववधूला शीतपेयामध्ये विषारी पावडर टाकण्यास प्रियकराने सांगितले. नवरदेवाची तब्येत बिघडून ठरलेल्या मुहूर्तावरचे लग्न रद्द होईल नंतर पळून जाऊ, असे प्रियकराने नववधूला सांगून हा सर्व प्रकार करायला लावला असल्याचेही त्या मुलीने पोलिसांना सांगितले.

Last Updated : May 6, 2021, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.