ETV Bharat / state

तलवारीने केक कापून नाचणे पडले महागात; ५ आरोपींना अटक - Birthday boy Kapil arrested Savleshwar

जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे वाढदिवसाचे औचित्य साधून चक्क तलवारीने केक कापला. तसेच, केक कापून कार्यक्रमात तलवार फिरवल्याचे व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी पोलिसांनी तलवार जप्त करून बर्थडे बॉय कपिल काळबांडे व इतर ४ आरोपींना अटक केली.

Birthday boy Kapil arrested Savleshwar
कपिल काळबांडे अटक सावळेश्वर
author img

By

Published : Apr 6, 2021, 3:10 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे वाढदिवसाचे औचित्य साधून चक्क तलवारीने केक कापल्याचा प्रकार घडला आहे. तसेच, केक कापून कार्यक्रमात तलवार फिरवल्याचे व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी पोलिसांनी तलवार जप्त करून बर्थडे बॉय कपिल काळबांडे व इतर ४ आरोपींना अटक केली.

तलावर फिरवतानाचे दृष्य

हेही वाचा - वणीत डॉक्टरांवर धारदार शस्त्राने हल्ला

व्हिडिओ वायरल

बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळेश्वर येथे कपिल काळबांडे याच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले. गाण्याच्या तालावर बेधुंदपणे थिरकत असतानाच बर्थडे बॉय कपिलने घरातील तलवार आणून केक कापला व गाण्याच्या तालावर तलवार फिरवत सिद्धार्थ काळबांडे, अजय काळबांडे, आकाश काळबांडे व स्वप्नील काळबांडे समवेत नाचू लागला. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्स अ‌ॅपवर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आर्म अ‌ॅक्टनुसार गुन्हा दाखल

गोपनीय माहितीच्या आधारे सावळेश्वर येथे पोलीस पोहचले व त्यांनी तलवार जप्त करून कपिल काळबांडे आणि त्याच्या ४ साथीदारांना अटक केली. बिटरगाव पोलिसांनी कोरोना महामारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे व आर्म अ‌ॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. ठाणेदार विजय चव्हाण हे या प्रकरणाचा तपास करीत आहे.

हेही वाचा - यवतमाळच्या मालानी बागेतील गोदामांना लागलेल्या आगीत 50 लाखांचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.