यवतमाळ - घरोघरी दुचाकी, चारचाकी वाहन आल्याने मागील काही वर्षे सायकल अडगळीत पडली होती. मात्र, सुदृढ आरोग्यासाठी लोकांना सायकलचे महत्व पटले आहे. म्हणूनच आज सायकल चालवणे ही प्रतिष्ठा मानली जात आहे. त्यामुळे महागड्या, स्टायलिश सायकलला ग्लॅमर प्राप्त झाले असून सायकल पुन्हा रस्त्यावर धावत आहे.
महाराष्ट्रातील मोठ्या शहरांचा विचार केला तर सायकल चालवणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असे आहे. मध्यंतरीच्या काळात शहरात सायकल वापराला घरघर लागली होती. परंतु शरीराला सायकलचे महत्त्व समजल्यानंतर अनेक नागरिकांनी पुन्हा आपला मोर्चा सायकलकडे वळवला. सर्वात कमी खर्चिक वाहन म्हणून सायकलकडे पाहिले जाते. आजही शालेय विद्यार्थी, शेतकरी, दूध विक्रेते यांची सायकललाच पसंती आहे. बाजारात विविध कंपन्यांचे वेगवेगळ्या रचनेचे, सोयी-सुविधा असलेल्या ‘बाइक्स’ येत आहेत. मात्र, त्यांना टक्कर देण्यासाठी लाखभर किंमतीच्या तीन ते 21 गियरपर्यंत सायकली बाजारात आलेल्या आहेत.
सायकलच्या किंमती वाढूनही सायकल खरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढतो आहे. आजही शालेय विद्यार्थी, शेतकरी, दूध विक्रेते आणि आता तर नोकरीवर असले क्लास वन ते कर्मचारीपर्यंत यांची सायकललाच पसंती वाढत आहे. बाजारात विविध कंपन्यांचे वेगवेगळ्या रचनेचे, सोयी-सुविधा असलेल्या महागड्या सायकल आल्या आहेत. अनेक ठिकाणी सायकल ग्रुपदेखील स्थापन करण्यात येत आहे. लोकं सकाळ आणि संध्याकाळ सायकलिंग करत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांचे बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले. यातून आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. लोकांना आता आरोग्याचे महत्व कळले आहे. जिम बंद असल्याने व्यायामात व्यत्यय आला. मात्र, सायकल द्वारा होणारा व्यायाम महत्वाचा आहे. बाजारात पाच हजार रुपयांपासून नऊ लाखांपर्यंत सायकल विक्रीसाठी उपलब्ध आहे. लहान शहरात पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या सायकल घेण्याकडे नागरिकांचा कल आहे.
गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीत कोरोनामुळे आरोग्याच्या इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. ऑफिस किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वाहनांचा वापर केला जातो. मात्र, व्यायाम करताना सायकलचा फायदा अधिक होताना दिसत आहे. याच बरोबर सायकलीचा वापर वाढल्याने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही मदत होणार आहे.
हेही वाचा - वाईनशॉप फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल