यवतमाळ - पुसदच्या अपूर्व राठोड मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज बंजारा समाज बांधवांनी मोर्चा काढला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - श्रीनगरमध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला; ३ जण जखमी
अपूर्व हा पूसदच्या बंजारा वसाहतीतील रहिवासी होता. एका खासगी ट्रॅव्हल्सने पुण्याला जात असताना त्याचा औरंगाबादमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. या ट्रॅव्हल्समध्ये अपूर्वचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याशिवाय सहप्रवाशांनी अपूर्वला मारहाण झाल्याचे जबाबात म्हटले आहे. याप्रकरणी आरोपींवर ३०२ चा गुन्हा दाखल करून सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकरांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा - देविंदर सिंग अटकेप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस आणि एनआएयचे छापे