यवतमाळ - दऱ्या खोऱ्या जिवन जगणारा समाज म्हणून बंजारा समाजाची ओळख आहेत. बंजारा समाज रूढी, परंपरा, बोली भाषा आणि संस्कृती जपत आला आहे. समाजातील अविवाहित मुलांचा उत्साह म्हणजे तीज (जवारा) हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यातून बंजारा समाजात आनंदाचे वातावरण आहे.
प्रत्येक तांड्यात आनंदाचे वातावरणतीज उत्सव पावसाळ्यातील श्रावण महिन्यात साजरा केला जात असून मुलींचा उत्सव मानला जातो. श्रावण महिना सुरू होताच बंजारा समाजातील तरूणी रानोमाळ विविध लोकगीत गातात. गाण्यामुळे तांड्या-तांड्यात वेगळे वातावरण निर्माण होते.
तांडा नायकाची घ्यावी लागते परवानगी
उत्सव साजरा करण्याआधी आपल्या समूहाच्या प्रमुख नायकाच्या परवानगीशिवाय साजरा केला जात नाही. बंजारा समाजातील अविवाहित मुलींचा समूह नायकाच्या घरी जमा होतो. मुली नायकासमोर तीज उत्सव साजरा करण्याविषयी प्रस्ताव मांडतात. लाडीगोडी लावतात. गीत गात गातात. मुलीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर नायक तत्कालीन परिस्थितीचा विचार करतो. तांड्यातील रोगराईची माहिती मिळवतो. कारभारी आणि तांड्यातील वडिलधाऱ्या मंडळीचा सल्लाही घेतो. त्यानंतर नायक तीज उत्सवाला परवानगी देतो.
मुली होतात भावनिक
विसर्जनच्या दिवशी अविवाहित मुली आणि लवकरच लग्न होणाऱ्या मुली भावनिक होतात. नृत्याद्वारे त्या भावाला उद्देशून म्हणतात, "भावा मी आता जातेय, मला साडी घेऊन दे रे भावा, मला सोडून ये रे भावा, मी मोठ्या आनंदाने येईल तुझ्या घरी असे सांगतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने नऊ ते अकरा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.
हेही वाचा - नसरुद्दीन शाहांचे काही मुसलमानांना खडेबोल, तालिबान समर्थकांना चपराक