यवतमाळ- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यातील नागरिक घरीच राहून कोरोना विषाणूला अटकाव करण्यास मदत करत आहेत. या काळात नागरिक व्यायाम, टीव्ही पहाने, वाचन इत्यादी करून आपला वेळ घालवत आहेत. यात जन प्रतिनिधी देखील मागे नाहीत. सतत लोकांच्या समस्या सोडवणारे आणि कामात गर्क असलेले राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील लॉकडाऊन पाळत असून घरूनच आपले काम करत आहेत.
कोरोणाच्या संकटामुळे घरीच विलगीकरणात असणारे राज्यमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू दररोज सकाळी उठून व्यायाम करतात. ते सुर्यदेवाला नमन करून ग्रंथ वाचन करतात. त्यानंतर अंगणातील झाडांना पाणी देणे, आंब्याच्या झाडांना ऊकरी देने, त्यानंतर स्वतःचा सकाळचा चहा स्वतःच तयार करणे, आंघोळ करून गुरुवर्यास नतमस्तक होऊन दैनंदिन कामकाज फोनच्या माध्यमातून करणे, ही सर्व कामे बच्चू कडू करत आहेत.
तसेच, कार्यालयीन कामकाज देखील बच्चू कडू हे घरूनच करत आहेत. नागरिकांच्या तक्रारी आल्यास कडू या सर्व तक्रारी आपल्या डायरीमध्ये नोदवून घेतात, त्याचबरोबर तक्रारींचे निवारणही करतात. त्यानंतर, कडू आपल्या कुटुंबासोबत बुद्धीबळ, कॅरम, लगोरी यासारखे खेळ खेळतात. कडू हे बऱ्याच दिवसांपासून घरी असून गेल्या १५ वर्षात पहिल्यांदाच ते कुटुंबासोबत इतका लांब काळ घालवत आहेत.
हेही वाचा- यवतमाळ : आयसोलेशन वॉर्डातून 31 जणांना सुट्टी, तर 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह