ETV Bharat / state

'दारूबंदीतून प्रश्न मिटणार नाही, त्यासाठी प्रबोधन करावे लागेल'

एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. मात्र, तिथे दारूबंदी फसली असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच दारूबंदी करायची असेल तर संपूर्ण महाराष्टात करा, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Assistance and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Feb 9, 2020, 3:33 AM IST

यवतमाळ - दारूबंदीमुळे अनेक ठिकाणी दारू माफिया निर्माण झाले आहेत. राज्याला 17 हजार कोटींचा महसूल फक्त दारूतून मिळतो. त्यामुळे दारूबंदी ऐवजी प्रबोधन करणे कधीही चांगले असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे. विजय वडेट्टीवार हे शनिवारी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया....

चंद्रपूर जिल्ह्यात शाळकरी मुलांच्या दप्तरातून दारू तस्करी केली गेली. आता चंद्रपूर जिल्ह्यात ड्रग्स वाढले आहे. तसेच दारू तस्करी करणाऱ्यांनी जंगलातून मार्ग काढले आहे. दारूबंदीचा चंद्रपूर जिल्ह्याला काही फायदा झाला नाही. त्यामुळे आता दारूबंदी करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात करावी, असे वक्तव्य राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

हेही वाचा... सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला

चंद्रपूर जिल्ह्यात 2 वर्षांत 180 कोटी रुपयांची दारू पकडली गेली. आता पकडलेल्या दारूचा लिलाव करावा आणि दारूबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस द्यावे, असा प्रस्ताव शासनासमोर मांडणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच दारूबंदीमुळे दारू माफिया निर्माण झाले आहेत. राज्याला 17 हजार कोटींचा महसूल फक्त दारूतून मिळतो. त्यामुळे दारूबंदी ऐवजी प्रबोधन करणे कधीही चांगले असल्याचे मत यावेळी वडेट्टीवार यांनी मांडले.

हेही वाचा... कर्जमाफीच्या मुद्यावरुन बच्चू कडूंचा बँकांवर गंभीर आरोप

Intro:Body:यवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्यात शाळकरी मुलांच्या दप्तरातून दारू तस्करी केली गेली. आता चंद्रपूर जिल्ह्यात ड्रग्स वाढले आहे. तसेच दारू तस्करी करणार्यांनी जंगलातून मार्ग काढले आहे.
दारूबंदीचा चंद्रपूर जिल्ह्याला काही फायदा झाला नाही. दारू बंधी करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात करावी असे वक्तव्य राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते आज जिल्हा दौऱ्यावर आले होते.
चंद्रपूर जिल्ह्यात 2 वर्षात 180 कोटी रुपयांची दारू पकडली गेली. आता पकडलेल्या दारूचा लिलाव करावा आणि दारुबाबत माहिती देणाऱ्याला यासाठी बक्षीस द्यावे असा प्रस्ताव शासनासमोर मांडणार असल्याचेही ते बोलले आहे. दारू बंधी मुळे दारू माफिया निर्माण झाले आहे.
राज्याला 17 हजार कोटीचा महसूल दारुतून मिळत आहे. दारू बंदी ऐवजी प्रबोधन करणे कधीही चांगले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

बाईट- विजय वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.