ETV Bharat / state

दीर्घ विश्रांतीनंतर यवतमाळमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी - yavatmal

जिल्ह्यात कपाशीचा पेरा हा साडेपाच लाख हेक्‍टर, सोयाबीन पावणेदोन लाख हेक्‍टरवर तर तूर दीड लाख हेक्‍टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दीर्घ विश्रांतीनंतर यवतमाळमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी
author img

By

Published : Jul 27, 2019, 7:36 PM IST

यवतमाळ - तीन आठवड्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस कोसळल्याने बळीराजाने सुटकेचा निश्वास टाकला असून पिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९११.३४ मिलिमीटर पावसाची सरासरीची नोंद झाली आहे.

दीर्घ विश्रांतीनंतर यवतमाळमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी

मागील काही वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठली नाही. प्रत्येक वेळी ६० ते ७० टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ १७.६२ टक्के पावसाने हजेरी लावली आहे. मागील २५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली होती. कपाशी, सोयाबीन, तूर हे पिके करपण्याची शक्यता होती. यातच शुक्रवार दुपारपासून पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहेत.

जिल्ह्यात कपाशीचा पेरा हा साडेपाच लाख हेक्‍टर, सोयाबीन पावणेदोन लाख हेक्‍टरवर तर तूर दीड लाख हेक्‍टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवार पासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी, बाबुळगाव, यवतमाळ, आर्णी, महागाव, घाटंजी, पुसद, दिग्रस, दारव्हा, उमरखेड, नेर व वणी या तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

जिल्ह्यात १ जून ते २७ जुलैपर्यंत सरासरी १५८.७० मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १७.६२ टक्के इतकी आहे.

Intro:दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी; बळीराजाने टाकला सुटकेचा निश्वासBody:यवतमाळ : तीन आठवड्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस कोसळल्याने बळीराजाने सुटकेचा निश्वास टाकला असून पिकांना संजीवनी मिळाली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले काल रात्रीच्या सुमारास सर्वदूर पावसाला सुरुवात झाली.

जिल्ह्यात 911.34 मिलिमीटर पावसाची सरासरीची नोंद आहे. परंतु, मागील काही वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठली नाही. प्रत्येक वेळी 60 ते 70 टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ 17.62 टक्के पावसाने हजेरी लावली आहे.
मागील 25 दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली होती. कपाशी, सोयाबीन, तूर हे पिके करपण्याच्या मार्गावर होते. यातच दुपारी उन्हाची दाहकता वाढल्याने पिके उकाडा वाढला होता. मात्र, काल दुपारपासून पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहेत. जिल्ह्यात कपाशीचा पेरा हा साडेपाच लाख हेक्‍टरवर तर सोयाबीन पावणेदोन लाख हेक्‍टरवर तर तूर दीड लाख हेक्‍टरवर लागवड करण्यात आली आहेत. त्यामुळे काल पासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी, बाबुळगाव, यवतमाळ, आर्णी, महागाव, घाटंजी, पुसद, दिग्रस, दारव्हा, उमरखेड, नेर व वणी या तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे 911.34 मिलिमीटर आहेत. तर जिल्ह्यात 1जून ते 27 जुलै पर्यंत सरासरी 158.97 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ 17.62 टक्के इतकी आहे.
वास्तवामध्ये 27 जुलैपर्यंत 470.27मिलीमीटर पाऊस पडून 36.74 टक्के वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस पडायला पाहिजे होता.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.