यवतमाळ - जिल्ह्यातील एकूण 925 ग्रामपंचायतीचे निकाल लागण्यास आज सकाळीच सुरुवात झाली होती. यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशातच पुसद तालुक्यातील आमटी व आर्णी तालुक्यातील तळणी आणि शिरपूर ग्रामपंचायतीमधील उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढत त्यांना विजयी घोषीत करण्यात आले.
चिमुकल्यांच्याहस्ते काढली ईश्वर चिट्टी -
पुसद तालुक्यातील आमटी ग्रामपंचायत निवडणुकीतील गोपाल वाघमारे तसेच विठ्ठल हाके या दोन उमेदवारांना प्रत्येकी 75 मते मिळाली होती. दोघांनाही समान मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अशोक गीते यांनी लहान मुलाच्या हाताने ईश्वर चिठ्ठी काढून गोपाल वाघमारे यांना विजयी घोषीत केले. तर आर्णी तालुक्यातील तळणी येथील ग्रामपंचायतमधील शेख मूज्जफर इसाक आणि सूरेश नरसू या दोन उमेदवारांना प्रत्येकी 186 मते मिळाली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आर्णी तहसिलदार परसराम भोसले यांनी दोन वर्षीय चिमूकली लक्ष्मी पूरी हीच्या हाताने इश्वर चिठ्ठी काढून शेख मूज्जफर इसाक यांना विजयी घोषीत केले. तसेच शिरपूर ग्रामपंचायतीमध्येही उमेदवार राठोड देवराव कीसन आणि राठोड पवन सूदाम यांना प्रतेकी 169 मते मिळाल्याने इश्वर चिठ्ठी काढून पवन राठोड यांना विजयी घोषीत करण्यात आले.
हेही वाचा - तृतीयपंथी अंजलीची 'रिक्षा' सुसाट; ग्रामपंचायतवर झेंडा फडकवणारी पहिली तृतीयपंथी