यवतमाळ - दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याने आज यवतमाळ जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प असलेल्या टिपेश्वर अभयारण्याला भेट दिली. नागरिकांना याची माहिती मिळताच त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आज सकाळी 6 वाजता अर्जुनने अभयारण्याच्या सुन्ना गेटवरून प्रवेश केला. 10 वाजेपर्यंत त्याने या अभयारण्यामध्ये पर्यटन केले.
कोरोनामुळे टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन नोंदणी बंद आहे. त्यामुळे ऑफलाइन नोंदणी करूनच अर्जुनने व्याघ्र दर्शनासाठी प्रवेश केला. अर्जुनने चाहत्यांना एकदा अभिवादनकरून तेलंगाणासाठीचा पुढचा प्रवास सुरू केला.