ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : 'दोषी कोणीही असो, गुन्हा असेल तर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे' - मनमोहनसिंह चव्हाण यांची मागणी

पूजा चव्हाण प्रकरणात व्यक्ती कुणीही असो, कितीही मोठी व्यक्ती असो इतकेच काय तर मंत्री असो, मुख्यमंत्री असो वा राज्यपाल असो, गुन्हा असेल तर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू, असा इशारा बंजारा समाजाचे नेते तथा माजी सभापती मनमोहनसिंह चव्हाण यांनी दिला आहे.

Manmohan Singh Chavan
मनमोहनसिंह चव्हाण
author img

By

Published : Feb 13, 2021, 9:51 PM IST

Updated : Feb 13, 2021, 10:08 PM IST

यवतमाळ - पूजा चव्हाण या तरुणीने पुणे येथे आत्महत्या केल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. सोशल मीडियातून ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याचे जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातील जनता ओळखू शकते. त्यामुळे या प्रकरणात व्यक्ती कुणीही असो, कितीही मोठी व्यक्ती असो इतकेच काय तर मंत्री असो, मुख्यमंत्री असो वा राज्यपाल असो, गुन्हा असेल तर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू, असा इशारा बंजारा समाजाचे नेते तथा माजी सभापती मनमोहनसिंह चव्हाण यांनी दिला आहे.

बंजारा नेते मनमोहनसिंह चव्हाण

आरोपी नसेल तर संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिनचीट द्यावी

मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी जोडले जात आहे. या प्रकरणात लवकरात लवकर मुख्यमंत्री यांनी निपक्षपाती चौकशी करावी. संजय राठोड़ यांना बडतर्फ करावे आणि नंतरच चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा. दोषी नसेल तर मुख्यमंत्री यांनी क्लिनचीट द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

बंजारा समाजाला कुणीही बदनाम केले नाही

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाज बदनाम होत आहे. पूजा चव्हाण या प्रकरणात बंजारा समाजाच्या मंत्र्यांमुळेच बंजारा समाज बदनाम होत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती.

Last Updated : Feb 13, 2021, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.