ETV Bharat / state

यवतमाळ : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका, 8 लाख 55 हजारांचा दंड वसूल

author img

By

Published : May 15, 2021, 7:33 PM IST

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून संचारबंदी सुरू आहे. यादरम्यान महसूल तसेच पोलीस विभागाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 226 कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून 8 लाख 55 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

यवतमाळ - वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून संचारबंदी सुरू आहे. यादरम्यान महसूल तसेच पोलीस विभागाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 226 कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून 8 लाख 55 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत संचारबंदीचे कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. संचारबंदी लागल्यानंतर अवघ्या महिनाभरातच नगरपरिषद, महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासनाने शहरातील विविध भागात तब्बल 226 दंडात्मक कारवाया केल्या असून, यातून 8 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

दोन दुकांना एक लाखांचा दंड

विशेष म्हणजे यामध्ये शहरातील आकाश फॅशन मॉल, व यशवंत किराणा या दोन दुकानांवर नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली. या दुकानांकडून दंड म्हणून प्रत्येकी 50 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. याशिवाय आज शहरातील विविध भागात पोलिसांनी फिरत्या पथकाद्वारे वीनाकारण बाहेर फिरणाऱ्या 346 नागरिकांची कोरोना चाचणी करून, चार हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. या 346 नागरिकांमध्ये केवळ एकाच नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा - काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.