यवतमाळ : दोन वर्षांपासून हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या एका हरहुन्नरी युवकाचा याच हेलिकॉप्टरच्या ट्रायलदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगीतून समोर आली आहे. शेख इस्माईल शेख इब्राहिम असे या 24 वर्षीय युवकाचे नाव असून मंगळवारी हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना त्याचा मृत्यू झाला.
चाचणीदरम्यानच मृत्यू
या हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यासाठी मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी रात्री तयारी केली. ट्रायल सुरू केल्यानंतर हेलिकॉप्टरचे इंजिन 750 अम्पिअरवर फिरत होते. सर्व व्यवस्थित सुरू होते. पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि वरील मुख्य फॅनला येऊन धडकला. हा फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचे स्वप्न होते की एक दिवस गावाचे नाव जगाच्या पटलावर आणायचे. मात्र इस्माईलचे स्वप्न अर्धवटच राहिले. दरम्यान, त्याच्या निधनावर परिसरातून शोक व्यक्त होत आहे.
हेही वाचा - मुंबईसह पाण्यात बुडणार 12 शहरं; NASA चा धडकी भरवणारा रिपोर्ट