ETV Bharat / state

विभागीय आयुक्तांकडून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला कामकाजाचे धडे

जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी वृक्ष लागवड योजना, ई-फेरफार, पीक कर्जवाटप, ई-स्कॅनिंग, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना आदी महत्वाच्या योजनांचा आढावा त्यांनी घेतला.

विभागीय आयुक्तांकडून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला कामकाजाचे धडे
author img

By

Published : Jul 26, 2019, 10:12 PM IST

यवतमाळ - जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी वृक्ष लागवड योजना, ई-फेरफार, पीक कर्जवाटप, ई-स्कॅनिंग, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना आदी महत्त्वाच्या योजनांचा आढावा त्यांनी घेतला.

ठराविक कालावधीत 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले आहेत. विविध विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दररोज केल्या जाणाऱ्या वृक्ष लागवडीची पोर्टलवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी खणण्यात आलेल्या खड्यांच्या संख्येवर उपवनसंरक्षकांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

याशिवाय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत लाभार्थ्यांची नावे अचूक नोंदवणे, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघात नाव नोंदणी करणे व मयत मतदारांची नावे वगळणे, जागेचे अंतर व मतदारांची संख्या आदी गोष्टी लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी कार्यवाही करणे याबाबतच्या सूचनादेखील या आढावा बैठकीत देण्यात आल्या.

आढावा बैठकीला मुख्य वनसंरक्षक आर.के. वानखेडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी आधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, अरविंद मुंढे, के. अभर्णा, अप्पर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Intro:दररोज वृक्ष लागवड करा, पोर्टलमध्ये नोंदणी करा; विभागीय आयुक्त पियुष सिंह; विविध विषयांचा घेतला आढावाBody:यवतमाळ : विविध विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दररोज वृक्ष लागवड करा. पोर्टलमध्ये नोंदणीचा आकडा बदलत राहणे आवश्यक आहे. गत तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. ठराविक कालावधीत ही 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम पुर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले. यासह ई-फेरफार, पीक कर्जवाटप, ई-स्कॅनिंग, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना याचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.
वृक्ष लागवडीकरीता जेवढे खड्डे झाले आहेत, त्यावर उपवनसंरक्षकांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आदेशही देण्यात आले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत लाभार्थ्यांची नावे अचूक अपलोड करा. तांत्रिक कारणास्तव जी नावे अपलोड होऊ शकत नाही, ती सोडून इतर नावे न थांबविण्याची सुचना देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी, निवडणूक अधिका-यांनी आपापल्या मतदारसंघात नाव नोंदणी, मतदार फोटो ओळखपत्र, मयत मतदारांची नावे वगळणे आदी कामे करावी. तसेच विशेष मोहीम राबवून नवीन मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ठ करावीत. जागेचे अंतर, मतदारांची संख्या आदी गोष्टी लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढवायची असेल तर तशी कार्यवाही करावी. तसेच याचा अहवाल सादर करन्याचे आदेश देण्यात आले.
आढावा बैठकीला मुख्य वनसंरक्षक आर.के. वानखेडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी आधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, अरविंद मुंढे, के. अभर्णा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.