यवतमाळ एका गर्भवती महिलेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीही हजर नसल्याने उपचार झाले नाही. त्यामुळे तिची व्हरांड्यातच प्रसूती झाली आणि त्यात नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा हाकणाऱ्या महाराष्ट्रातील ही संतापजनक घटना आहे. yavatmal latest news यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडुळ इथल्या पीएचसीमधील या बेधुंद कारभाराने आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे.
नवजात बाळाचा प्रसूतीनंतर मृत्यू शुभांगी हाफसे ही गर्भवती महिला प्रसूतीसाठी आपल्या माहेरी विडुळ येथे आली होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिच्या वडिलांनी 108 रुग्णसेवा वाहिकेला फोन केला होता. मात्र 2 तास वेळ लागत असल्याने त्यांनी ऑटोद्वारे पीएचसी आरोग्य केंद्र गाठले. yavatmal latest news परंतु पीएचसीत वैद्यकीय अधिकारी वा कुणीही कर्मचारी हजर नसल्याने गर्भवती महिला प्रवेशद्वाराजवळील व्हरांड्यात थांबली. यावेळी असह्य प्रसवकळा होऊन तिथेच तिची प्रसूती झाली. त्यामुळे नवजात बाळाचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा राज्यात बीए व्हेरिएंटचे २८२ नवीन रुग्ण, तर मुंबईत २०३ रुग्ण