ETV Bharat / state

यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच; तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - yavatmal faemer news

तरुण शेतकऱ्याने पिकाचे नुकसान झाले म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाणी या गावात घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात सुरू असताना ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

युवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
author img

By

Published : Aug 6, 2019, 2:22 PM IST

यवतमाळ - राज्यात गेल्या ५ वर्षात तब्बल १२ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. तसेच त्यावर उपाययोजना म्हणून सरकारने कर्जमाफी केली तरीही शेतकरी आत्महत्तेचे सत्र थांबतच नाही. यवतमाळमध्ये अशाच एका तरुण शेतकऱ्याने पिकाचे नुकसान झाले म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाणी या गावात घडली.

युवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

अमोल दिगंबर अजमीरे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी सेंट्रल बँकेचे १ लाख रुपयांचे कर्ज असल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच त्यांची गोकी धरणाला लागून ४.५ एकर शेती आहे. शेतामध्ये कपाशी व सोयाबीन हे पीक होते. मात्र, भरपूर पावसामुळे शेतामध्ये पाणी गेल्याने शेतातील कापूस आणि सोयाबीन पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच डोक्यावर कर्जाचे ओझे आणि अतिवृष्टीमुळे खरिपाचे पिक वाया गेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे.

यवतमाळ जिल्हा आगोदरच शेतकरी आत्महत्यामुळे कुप्रसिद्ध आहे. आणि त्यात या घटनेने पुन्हा एकदा सरकार अपयशी ठरले आहे. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात नुकतीच सुरू आहे. त्यातच ही घटना घडली आहे.

Intro:Body:यवतमाळ : शेतातील पिकात पाणी भरल्याने युवा शेतकऱ्यांने गळफास लावून आत्महत्या
तरुण शेतकऱ्यांने गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याची घटना चाणी गावामध्ये घडली. अमोल दिगंबर अजमिरे असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
सेंट्रल बँकेचे 1 लाख रुपयांचे कर्ज अंगावर होते.
या शेतकऱ्याचे गोकी धरणाला लागून साडेचार एकर शेती आहे. शेतामध्ये कपाशी व सोयाबीनची लागवड केली होती. या शेतामध्ये पाणी गेल्याने शेतातील कापूस सोयाबीन चे पीक धोक्यात आले. आधीच डोक्यावर कर्ज आणि पाण्यामुळे हंगामातील पिके वाया जाणार असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

यवतमाळ जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्यामुळे प्रकाश झोतात आहे.
मुख्यमंत्रीच्या देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जिल्ह्यात येणार आहे. मुख्यमंत्री आगमना पूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या केल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.