यवतमाळ - जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यातील 114 जणांनी कोरोनावर मात केली असून 50 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 50 जणांमध्ये 35 पुरुष आणि 15 महिला आहेत. यात यवतमाळ तालुक्यातील 18 पुरुष व चार महिला, राळेगाव येथील दोन पुरुष, दिग्रस येथील चार पुरुष व दोन महिला, दारव्हा येथील दोन पुरुष व तीन महिला, कळंब येथील तीन पुरुष व तीन महिला, घाटंजी येथील एक पुरुष, उमरखेड येथील एक पुरुष व एक महिला, मारेगाव येथील दोन पुरुष व एक महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या 339 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 हजार 818 झाली 7 हजार 559 कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 284 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेले माहितीनुसार आतापर्यंत 77 हजार 293 नमुने पाठविले असून यापैकी 76 हजार 341 प्राप्त तर 952 अप्राप्त आहेत. तसेच 67 हजार 476 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.
हेही वाचा - कृषी कायदा : महाविकास आघाडी विरोधात भाजपा आक्रमक, बाजार समितीत आदेशाची होळी