ETV Bharat / state

यवतमाळ : अंजी नाईक येथे जेवणातून 45 जणांना विषबाधा - 45 जणांना जेवणातून विषबाधा

आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथे 45 जणांना जेवनातून विषबाधा झाली आहे. त्यांनी एका कार्यक्रमात जेवण केले होते. यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अंजी नाईक
अंजी नाईक
author img

By

Published : Aug 18, 2021, 1:42 AM IST

यवतमाळ - आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथे 45 जणांना पंगतीच्या जेवनातून विषबाधा झाल्याची घटना सोमवारी (16 ऑगस्ट) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

अंजी नाईक येथे जेवणातून 45 जणांना विषबाधा

जेवणातून विषबाधा

अंजी नाईक येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सर्वांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच कार्यक्रमामध्ये जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जवळपास 45 जण या कार्यक्रमात जेवले होते. यानंतर ते आपापल्या घरी गेले होते. 17 ऑगस्टला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सर्वांच्या पोटात दुखणे, संडास व उलट्या सुरु झाले.

पहाटेच त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल

गावातील नागरिकांनी सर्वांना भांबोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. परंतु काहींची तब्बेत खालावत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेला व मुलाला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यास सांगितले.

सर्वांची प्रकृती स्थिर

विषबाधा झालेल्या व्यक्तीवर भांबोरा येथील वैद्यकीय अधिकारी पवार व आर्णी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल भवरे व नितिन लकडे यांनी तत्काळ उपचार केले. सध्या सर्वांची प्रकृती ठिक असल्याचे समजते आहे.

विषबाधा झालेले नागरिक

अंजी नाईक येथे पंगतीच्या जेवनात विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये विशाल चव्हाण, खुशाल चव्हाण, युवराज चव्हाण, ममता चव्हाण, छकुली चव्हाण, नवीन चव्हाण, संजय राठोड, विष्णू चव्हाण, राजू पवार, सुरज राठोड, हर्षद राठोड, गोपाल पवार, प्रवीण राठोड, दिनेश राठोड, किसनबाई राठोड, धनश्री राठोड, मंजी चव्हाण, मोहन राठोड, बलदेव चव्हाण, मनिष राठोड, विवेक राठोड, सुरेश राठोड, धीरज राठोड, धनसिंग राठोड, रवी राठोड, गजानन राठोड, रेखा राठोड, पद्मा राठोड, प्रतीक्षा राठोड, भूमिका राठोड, शोभा राठोड, शीतल राठोड, अरविंद राठोड, सुखदेव राठोड, विवेक राठोड, उमेश राठोड, गणेश राठोड, जितेंद्र राठोड, विजय राठोड, मधुकर राठोड, सुनिता राठोड व गजानन जाधव यांचा समावेश आहे. या सर्वांवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा - राज ठाकरे नक्की नातू कोणाचे, प्रबोधनकारांचे की पुरंदरेंचे? हर्षल बागलांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.