यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 45 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 59 जण भरती आहेत. यात 14 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत धानोरा (ता. उमरखेड) येथील एकूण 62 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यापैकी 44 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर, गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता 18 नमुने पाठविले. सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 648 नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. यापैकी 1 हजार 582 अहवाल प्राप्त तर 66 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 1 हजार 528 रिपोर्ट निगेटिव्ह आल्या आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 22 जण तर गृह विलगीकरणात एकूण 1 हजार 326 जण आहेत.
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला असून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. तरीसुध्दा नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने स्वत:च्या घरातच रहावे, विनाकारण बाहेर पडू नये. अत्यावश्यक कारणास्तव बाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा. सुरक्षित अंतराचे काटेकारपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.