ETV Bharat / state

यवतमाळमध्ये चारशे महिला पोलीस कर्मचारी बनल्या आहेत कोरोनाविरोधातील ढाल ! - lockdown yavtmal

यवतमाळ जिल्ह्यात 400 महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रखरखत्या उन्हात आपले कर्तव्य बजावत आहेत.

Women police Yavatmal
महिला पोलीस कर्मचारी यवतमाळ
author img

By

Published : May 8, 2020, 1:02 PM IST

यवतमाळ - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लगाम लावण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना रस्त्यावर येण्यापासून परावृत्त करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात आहे. यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 400 महिला पोलीस कर्मचारी पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रखरखत्या उन्हात आपले कर्तव्य बजावत आहे.

यवतमाळमध्ये लॉकडाऊनच्या काळात 400 महिला पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत...

हेही वाचा... औरंगाबाद पोलीस विभागात कोरोनाचा शिरकाव, पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना लागण

यवतमाळमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तर चक्क आपला साखरपुडा बाजूला ठेऊन कोरोनाच्या युद्धात उडी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर या गेल्या वर्षी यवतमाळ येथे रुजू झाल्या. त्यांनी आपल्या कार्यशैलीने पोलीस विभागात एक वेगळीच छाप निर्माण केली आहे. सध्या त्या सध्या कोरोनाचा उद्रेक असलेल्या भोसा परिसरात प्रतिबंधित भागात कर्तव्यावर आहेत. पुणे येथील भारतीय महसूल सेवेत नोकरीला असलेल्या एका अधिकाऱ्याच्यासोबत त्यांचा 12 एप्रिलला साखरपुडा ठरला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी कर्तव्यावर राहणे महत्वाचे मानले. 'आधी कोरोनाच्या संकटाला हद्दपार करायला पाहिजे आणि त्यानंतर मग वैयक्तिक कामाला महत्व द्यायला पाहिजे' असे त्या म्हणतात.

मार्चपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 82 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून काम होत आहे. त्यात पोलिसांचा सिंहाचा वाटा आहे. सध्या जिल्ह्यात 40 अंशापेक्षा जास्त तापमान आहे. या रखरखत्या उन्हात उभे राहून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. यात यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील 400 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा... धक्कादायक! 'तुम्हाला कोरोनाची लागण केल्याशिवाय सोडणार नाही,' बाधित जवानांची रुग्णालयात दहशत

'सर्व पोलीस कर्मचारी स्वतः चा जीव धोक्यात घालून काम करत आहे. मात्र, नागरिकांनी स्वतःच्या कुटुंबासाठी घरी राहावे. कोणीही घराबाहेर निघू नये' असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.