यवतमाळ - गेल्या 24 तासात जिल्ह्यात 353 जण पॉझिटिव्ह आले आहे. तर 625 जण कोरोनामुक्त झाले असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 9 मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, दोन मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर पाच मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे.
4048 सक्रिय रुग्ण
बुधवारी एकूण 6 हजार 937 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 353 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 6 हजार 584 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4048 रुग्ण सक्रिय असून यापैकी रुग्णालयात भरती 2020 तर गृह विलगीकरणात 2028 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 69 हजार 301 झाली आहे. 24 तासात 625 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 63 हजार 587 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 666 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 12.54, मृत्यूदर 2.40 आहे.
1250 बेड्स उपलब्ध
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 32 खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण बेड्सची संख्या 2244 आहे. यापैकी 994 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1250 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 326 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 251 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 136 रुग्णांसाठी उपयोगात, 390 बेड शिल्लक आणि 32 खासगी कोविड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 532 उपयोगात तर 609 बेड शिल्लक आहेत.
हेही वाचा - धक्कादायक..! डॉक्टरांनी मृत रुग्णावर चक्क ४ दिवस केला उपचार, नांदेडमधील रुग्णालयातील प्रकार