ETV Bharat / state

16 अपघातग्रस्त मजूर बरे होऊन झारखंडला रवाना, बस-टिप्परच्या धडकेत झाले होते जखमी

गत आठवड्यात 19 मे रोजी स्थलांतरित मजुरांना सोलापूरहून नागपूरला घेऊन जाणाऱ्या बसचा आर्णी तालुक्यातील कोळवण येथे अपघात झाला होता. या अपघातात चार जण ठार तर 28 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये झारखंडचे 19 मजूर, छत्तीसगडचे आठ आणि मध्यप्रदेशचे तीन असे एकूण 30 जण आणि दोन चालक होते.

author img

By

Published : May 26, 2020, 10:17 AM IST

migrant workers news
migrant workers news

यवतमाळ - अपघातात जखमी झालेल्या 16 मजुरांना पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना काल (दि. 25) शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. या स्थलांतरित मजुरांना नागपूरला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला होता. या सर्वांना त्यांच्या राज्यात झारखंडला पाठविण्यासाठी येथील जिल्हा प्रशासनाने विशेष व्यवस्थासुद्धा केली.

गत आठवड्यात 19 मे रोजी स्थलांतरित मजुरांना सोलापूरहून नागपूरला घेऊन जाणाऱ्या बसचा आर्णी तालुक्यातील कोळवण येथे अपघात झाला होता. या अपघातात चार जण ठार तर 28 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये झारखंडचे 19 मजूर, छत्तीसगडचे आठ आणि मध्यप्रदेशचे तीन असे एकूण 30 जण आणि दोन चालक होते. सर्व जखमींना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आल्यावर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यापैकी 16 मजूर उपचाराअंती पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना झारखंड राज्यातील पलामू जिल्ह्यात विशेष व्यवस्थेने रवाना करण्यात आले.

अपघाताचे वृत्त माहिती होताच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, जिल्हा प्रशासन अपघातात जखमींची पूर्ण काळजी घेईल, कोणतीही कमतरता जाणवू देणार नाही, आवश्यक सर्व बाबी प्रशासनाकडून करण्यात येईल, तसेच बरे झाल्यानंतर आपापल्या राज्यात जाण्यासाठी येथील प्रशासन सहकार्य करेल, असे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. आठवडाभर जखमींवर उपचार केल्यानंतर 16 मजुरांना महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. जाताना सर्व मजुरांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच येथील डॉक्टरांचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.