ETV Bharat / state

धक्कादायक; ज्वारीचे फुटवे खाल्याने तेरा गायी दगावल्या - यवतमाळ

दुष्काळामुळे जनावरांना चारा उपलब्ध नाही. त्यामुळे चाऱ्याच्या शोधात जनावरं रानोमाळ हिंडतात. त्यातूनच हिरवे फुटवे गायींनी खाल्ल्याने १३ गायी दगावल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली.

उपचार करताना डॉक्टर
author img

By

Published : Jun 3, 2019, 11:34 PM IST

यवतमाळ - शेतातील ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने 19 जनावरांना विषबाधा झाली. त्यामध्ये 13 गायीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा पंचनामा केला आहे. ही घटना महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली.

फुटवे खाऊन गंभीर झालेल्या गायी

महागाव तालुक्यात दुष्काळाचे सावट असून जनावरांना खाण्यासाठी कुठेही चारा नाही. गुंज परिसरात जनावरांची संख्खा जास्त आहे. त्यामुळे कुठेही रानावनात जनावरांचे कळपच्या-कळप भूक भागवण्यासाठी सैरावैरा फिरतात. जिथे हिरवे दिसेल, तिथे जनावरं धाव घेतात. उन्हाळी ज्वारीचे हिरवेगार फुटवे हे जनावरांसाठी जिव घेणे ठरत आहेत. परिसरात शासनाकडून चारा छावण्या उभारण्याची गरज आहे. जनावरांच्या उपजीविकेचा प्रश्न मिटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:ज्वारीचे फुटवे खाल्याने तेरा गायी दगावल्याBody:यवतमाळ : महागाव तालुक्यातील गुंज सर्कलमधील पिंपळगाव येथील शेतकर्‍यांच्या जनावरांचा कळप सारकिन्ही शिवारात चरण्यासाठी गेला आसता शेतातील ज्वारीचे फुटवे खाण्यात आल्याने 19 जनावरांना विषबाधा झाली. त्यामध्ये 13 गायीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा पंचनामा करून अहवाल तयार केला. महागाव तालुक्यात दुष्काळाचे सावट असुन जनावरांना खाण्यासाठी कुठेही चारा नाही गुंज परिसरात जनावरांची संख्खा जास्त आहे. त्यामुळे कुठेही रानावनात जनावरांचे कळपच्या-कळप भुक भागवण्यासाठी सैरावैरा फिरत असतात. जिथे हिरवे दिसेल तिथे जनावर धाव घेतो. उन्हाळी ज्वारीचे हिरवेगार फुटवे हे जनावरांसाठी जिव घेने ठरत आहे. परिसरात शासनाकडून चाराछावण्या उभारण्याची अत्यंत गरज आहे तरच जनावरांच्या उपजीविकेचा प्रश्न मिटेल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.