ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात 300 कोरोनामुक्त; 123 पॉझिटिव्ह, 3 मृत्यू

गत 24 तासांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 123 जण पॉझिटिव्ह, तर 300 जण कोरोनामुक्त झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तीनही मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे.

corona review yavatmal
कोरोना मृत्यू यवतमाळ
author img

By

Published : May 31, 2021, 10:06 PM IST

यवतमाळ - गत 24 तासांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 123 जण पॉझिटिव्ह, तर 300 जण कोरोनामुक्त झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तीनही मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे.

पॉझिटिव्हिटी दर 11.60

आज एकूण 4 हजार 354 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 123 जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर 4 हजार 231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 649 रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 694, तर गृह विलगीकरणात 955 रुग्ण आहेत. तसेच, आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 71 हजार 813 झाली आहे.

हेही वाचा - काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे 48 पोते रेशनचे धान्य जप्त

24 तासांत 300 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 68 हजार 404 आहे. तर, जिल्ह्यात एकूण 1 हजार 760 मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लक्ष 19 हजार 253 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 44 हजार 29 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 11.60 असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.82 आहे, तर मृत्यूदर 2.45 आहे. आज खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये पांढरकवडा तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 65 व 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

हेही वाचा - उच्चांकी इंधन दरवाढ : पेट्रोल 101.55 तर डीझेल 92.10 रुपये प्रतिलिटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.