ETV Bharat / state

दारू तस्करांवर कारवाई करत मारेगावात जप्त केला 10 लाखांचा मुद्देमाल - yavatmal Liquor news

एसडीपीओ पथकाने ही कारवाई केली. 10 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली असून दुकान मालक व एक आरोपी फरार आहे.

दारूतस्करी
दारूतस्करी
author img

By

Published : Feb 24, 2021, 5:41 PM IST

Updated : Feb 24, 2021, 8:15 PM IST

यवतमाळ - मारेगाव येथे पोलिसांनी दारू तस्करांवर कारवाई करत सुमारे 4 लाखांच्या देशी दारुसह दोन कार व एक दुचाकी जप्त केली. एसडीपीओ पथकाने ही कारवाई केली. 10 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली असून दुकान मालक व एक आरोपी फरार आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे धाड

मारेगाव येथील अक्षरा बारमागे ए.वाय. जयस्वाल यांचे देशी दारुचे दुकान आहे. भट्टीचे मालक नीलेश जयस्वाल हा त्याच्या दुकानातून चंद्रपूर येथे अवैधरित्या दारू सप्लाय करणार असल्याची गोपनीय माहिती एसडीपीओ पथकाला मिळाली. पोलीस पथक तिथे पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना दुकानासमोर दोन स्विफ्ट डिजायर गाडी (MH02 BG 4643) व (MH31 EA4338) उभ्या होत्या. या दोन्ही कारमध्ये दारूच्या पेट्या ठेवल्या जात असल्याचे पोलिसांना आढळून आहे. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. अचानक मारलेल्या धाडीमुळे तस्करांचा गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ प्रमोद कृष्णाजी ठेंगणे (33, रा. मारेगाव) व अतुल रामदार वऱ्हाटे (31, रा. घोडदरा) यांना ताब्यात घेतले.

घटना स्थळावरून मुद्धेमाल जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून 152 पेट्या देशी दारू ज्याची किंमत 3 लाख 88 हजार 128 रुपये व दोन कार ज्याची किंमत 6 लाख व एक दुचाकी ज्याची किंमत 30 हजार रुपये असा एकूण 10 लाख 18 हजार 128 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी घटनास्थळी आढळून आलेले प्रमोद ठेंगणे, अतुल वऱ्हाटे यांच्यासह दुकान मालक नीलेश जयस्वाल व एका फरार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जगदीश मंडलवार यांनी केली.

Last Updated : Feb 24, 2021, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.