वाशिम - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
जिल्ह्यात एखाद्या राजकीय व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी आपल्या फेसबूक खात्यावरुन कोरोना झाल्याची माहिती सर्वांना दिली आहे. यावेळी त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करुन घेण्याचेही आवाहन केले आहे.
त्रास होऊ लागण्याने चंद्रकांत ठाकरे यांनी सहकुटुंब कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या घरातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते म्हणाले, मी लवकरच बरा होऊन जनतेच्या सेवेसाठी हजर होणार आहे.