ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक; वाशिम जिल्ह्यात बंडखोरीचा फायदा मिळणार कुणाला? - Assembly election 2019 live maharashtra

२०१४ मध्ये जिल्ह्यात कारंजा आणि वाशिम या दोन मतदारसंघात भाजपने विजय मिळविला होता. तर रिसोड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यात काँग्रेसला यश आले होते. यंदा बंडखोरी, वंचित फॅक्टर हे निकालावर किती परिणाम टाकतील व त्यामुळे जिल्ह्यात कोणता पक्ष किती जागा मिळवेल हे उद्याच कळेल.

वाशिम
author img

By

Published : Oct 23, 2019, 4:31 PM IST

वाशिम- विधानसाभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी सोमवारी मतदान पार पडले. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात ६०% मतदान झाले आहे. आता उमेदवारांसह कार्यकर्ता व मतदारांचा नजरा गुरूवारी लागणाऱ्या निकालावर खिळल्या आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात कारंजा आणि वाशिम या दोन मतदारसंघात भाजपने विजय मिळविला होता. तर रिसोड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यात काँग्रेसला यश आले होते. यंदा बंडखोरी, वंचित फॅक्टर हे निकालावर किती परिणाम टाकतील व त्यामुळे जिल्ह्यात कोणता पक्ष किती जागा मिळवेल हे उद्याच कळेल.

दरम्यान, जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात माजी मंत्री व अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांची काँग्रेसच्या अमित झनक यांच्याशी चुरशीची लढत आहे. या लढतीकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमित झनक यांनी रिसोड मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यांनी भाजपचे विजय जाधव यांचा पराभव केला होता. त्यावेळी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत होते. मात्र यंदा भाजप, शिवसेना आणि इतर पक्ष मिळून माहायुती झाल्याने रिसोड मतदारसंघातून काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेचे विश्वनाथ सनप उभे आहे. त्यामुळे रिसोड मतदारसंघातील लढत चुरशीची आणि महत्वाची झाली आहे.

रिसोड मतदारसंघ आढावा

विधानसभा निवडणूक २०१९ साली रिसोड मतदारसंघात ६६.१३ % मतदान झाले आहे. २०१४ साली या मतदारसंघात ६३.४१ % मतदान झाले. यंदा रिसोड मतदारसंघातून १६ उमेदवार उभे आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडून अमित झनक, शिवसेनेकडून सनप विश्वनाथ अश्रूजी, एमआयएम तर्फे दाताराव भिकाजी धांधे लडत आहेत. रिसोडची जागा शिवसेनेला गेल्याने येथे भाजपचा उमेदवार उतरला नाही.

२०१४ साली रिसोड मतदारसंघातून काँग्रेसचे अमित झनक यांचा विजय झाला होते. ते ७० हजार ९३९ मतांनी विजयी झाले होते. त्यांची लढत भाजपचे विजय जाधव यांच्याशी होती. मात्र, १६ हजार ८०८ मतांनी जाधव यांचा पराभव झाला. जाधव यांना निवडणुकीत ५४ हजार १३१ मते मिळाली होती. त्यांच्या पाठोपाठ तीसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे विश्वनाथ सानप, ४ स्थानावर बीबीएमचे रामकृष्ण कलापड आणि ५ क्रमांकावर मनसेचे राजू राजे होते. २०१४ साली निवडणुकीत १७ उमेदवारांनी भाग घेतला होता.

सद्याचे चित्र पाहता रिसोड मतदारसंघ हा काँग्रसचा बालेकिल्ला आहे. १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता येथे काँग्रेसच्याच उमेदवाराने विजय मिळविला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक, अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख आणि एमआयएम तर्फे दिलीप जाधव यांच्यात चुरशीची लढाई आहे.

वाशिम मतदारसंघ आढावा

२०१४ साली वाशिम मतदारसंघातून भाजपच्या मलिक सहदेव यांनी ४८ हजार १९६ एवढी मत घेऊन मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यांची लढत शिवसेनेचे निलेश पेंदारकर यांच्याशी होती. यंदा वाशिम मतदारसंघात ५८.८४ % मतदान झाले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर नेते व अपक्ष उमेदवार नीलेश पेंदारकर, वंचितचे उमेदवार डॉ. सिद्धार्थ देवळे आणि काँग्रेसच्या रजनी महादेव राठोड लडत आहे. सद्याचे चित्र पाहता शिवसेनेची बंडखोरी, काँग्रेस नेत्यांची नारजी व मताचे विभाजन होऊन त्याचा फायदा वंचितला होण्याची शक्यता आहे.

कारंजा मतदारसंघ आढावा

२०१४ साली कारंजा मतदारसंघातून भाजपचे राजेंद्र पटणी यांनी ४४ हजार ७५१ एवढी मत घेऊन विजय मिळवला होता. त्यांची लढत भारिपचे युसूफ पुंजानी यांच्याशी होती. यंदा कारंजा मतदारसंघात ६१.४१ % मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार रोजेंद्र पाटणी, बसपकडून मो.युसूफ पुंजानी, वंचितकडून डॉ. राम चव्हाण, आणि राष्ट्रवादीकडून प्रकाश डहाके लडत आहेत. सद्याचे चित्र पाहता या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना एकत्र लढतीचा भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.

Intro:Body:

state news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.