वाशिम - युवक काँग्रेसच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील सर्व भागात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत निधी फेरी काढण्यात आली होती. सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून हा निधी पाठविण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी युवक काँग्रेसची मदत निधी फेरी
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून 10 ऑगस्टला वाशिम जिल्ह्यात युवक काँग्रेसच्यावतीने मदत निधी फेरी काढण्यात आली हेती.
वाशिम शहरासह मानोरा, कारंजा मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव शहरात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ही मदत निधी फेरी काढली. हा निधी राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदत कार्यासाठी दिला जाणार आहे, असे युवक काँग्रेसे तालुका अध्यक्ष दिनेश मोरे यांनी सांगितले.