ETV Bharat / state

पीक नुकसान भरपाईसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी

मालेगाव तालुक्यातील मुंगळा महसूल मंडळ सोडून इतर गावांना सर्व्हेमधून वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला.

सोयाबीनची होळी
author img

By

Published : Nov 2, 2019, 1:13 PM IST

वाशिम - मालेगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, कापूस ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी म्हणुन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी पावसामुळे खराब झालेल्या सोयाबीनची होळी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

पीक नुकसान भरपाईसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

हेही वाचा - नुकसानीचे सर्वेक्षण करायला आलेले अधिकारी अडकले गाळात

तालुक्यातील मारसूळ गावच्या शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता. मालेगाव तालुक्यातील मुंगळा महसुल मंडळ सोडून इतर गावांना सर्व्हेमधून वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. भाजप सरकार विधानसभेच्या विजयामध्ये रमले असून त्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

हेही वाचा - अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा - बबनराव लोणीकर

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा घुगे यांनी केली.

Intro:वाशिम..

स्लग : पीक नुकसानीच्या भरपाइसाठी सोयाबीन घेऊन शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

अँकर : वाशिम जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील परतीच्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे.
या पावसामुळे खरीपाचे सोयाबीन,ज्वारी,कपाशी ही पिकं उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.

व्हिओ: या पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी म्हणून मारसूळ गांवचे शेतकरी खराब झालेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. व सोबत आणलेलं खराब झालेली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर पिकांची होळी करून सरकारचा निषेध केला.यावेळी जिल्हाधिकारी निवेदन देऊन शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे..

बाईट : 1)बाळू घुगे,शेतकरी
2)रत्नप्रभा घुगे, जि. प सदस्याBody:पीक नुकसानीच्या भरपाइसाठी सोयाबीन घेऊन शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावरConclusion:पीक नुकसानीच्या भरपाइसाठी सोयाबीन घेऊन शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.