ETV Bharat / state

Washim District Year Ender 2021 : संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा, खासदार गवळी यांच्या संस्थेवर ईडीचा छाप्यासह 'या' घडामोडींमुळे चर्चेत राहिला वाशिम जिल्हा

2021 या वर्षात अनेक घटना व घडामोडींनी वाशिम जिल्हा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिला. मावळत्या वर्षात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर वाशिम जिल्ह्यातील ( Washim District Year Ender 2021 ) या वर्षातील महत्त्वाच्या घटना लक्ष वेधत होत्या. वाशिम जिल्ह्यातील मावळत्या वर्षातील महत्वाची घटना ( Important Events in the Year 2021 in Washim district ) म्हणजे तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा, किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी खासदार भावना गवळी ( Shivsena MP Bhavana Gawali ) यांच्यावर शंभर कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावला त्यानंतर ईडीने भावना गवळी यांच्या संस्थांवर छापेमारी केली. गवळी यांच्या संस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या सोमैया यांच्या वाहनावर गवळी समर्थकांनी शाई फेक केली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 28, 2021, 5:32 PM IST

Updated : Dec 28, 2021, 6:17 PM IST

वाशिम - 2021 या वर्षात अनेक घटना व घडामोडींनी जिल्हा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिला. मावळत्या वर्षात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर वाशिम जिल्ह्यातील ( Washim District Year Ender 2021 ) या वर्षातील महत्त्वाच्या घटना लक्ष वेधत होत्या. वाशिम जिल्ह्यातील मावळत्या वर्षातील महत्वाची घटना ( Important Events in the Year 2021 in Washim district ) म्हणजे तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा, किरीट सोमैया यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर शंभर कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावला त्यानंतर ईडीने भावना गवळी यांच्या संस्थांवर छापेमारी केली. गवळी यांच्या संस्थेची पाहणी करण्यासाठी आलेल्या सोमैया यांच्या वाहनावर गवळी समर्थकांनी शाई फेक केली.

  1. वनमंत्री संजय राठोड राजीनामा : पूजा चव्हाण या कथित नावाने महाराष्ट्रातील राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे. मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात मंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्यात शिवसेना नेते आणि राज्याचे तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नावही उघड झाले होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करू लागले होते. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. तिथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. मात्र, संजय राठोड यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. तसेच, घरातून निघाल्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात गाड्यांचा ताफादेखील होता. कोरोनामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यात राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध आणल्यानंतर मंत्रिमंडळातील नेत्याकडूनच नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर संजय राठोड यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
    संपादित छायाचित्र
    संपादित छायाचित्र
  2. भावना गवळीवर किरीट सोमैयांचे आरोप : खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून 55 कोटीचा कारखाना केवळ 25 लाखात विकत घेतल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी केले होते. दुसरीकडे खासदार भावना गवळी ( Shivsena MP Bhavana Gawali ) यांनी सर्व आरोप फेटाळून लावत भाजपा आमदार राजेंद्र पाटणी ( BJP MLA Rajendra Patni ) यांच्या घोटाळ्याची चौकशी ईडीकरून करण्याची मागणी केली होती.
    भाजप नेते किरीट सोमैया
    भाजप नेते किरीट सोमैया
  3. किरीट सोमैया यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाई फेक : 'शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर पाहणी करण्यासाठी किरीट सोमैया आले होते. तेव्हा भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमैया यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाई फेक केली होती.
    किरीट सोमैया यांच्या वाहनावर झालेली शाईफेक

  4. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थावर ईडीचा छापा : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या ( ED Raid ) होत्या. किरीट सोमैया यांनी भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर ईडीने धाड टाकत भावना गवळी यांच्या संस्थाची चौकशी सुरू केली आहे.
    खासदार भावना गवळी
    खासदार भावना गवळी
  5. बिटकॉईनचा व्यवसाय : नागपुरातून अपहरण करून वाशिममध्ये गोळ्या झाडून खून : माधव पवार यांचे नागपुरातून अपहरण करण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे शेतशिवारात नेऊन गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. माधव पवार व आरोपी निशीद वासनिक यांचा नागपूर येथे बिटकॉईनचा व्यवसाय होता. निशीद वासनिकवर नागपूरमध्ये विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारात वाद निर्माण झाला होता. मृत माधव पवार यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये सर्व व्यवहाराची माहिती असल्याने त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली होती.
    अटकेतील आरोपी
    अटकेतील आरोपी
  6. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्या कुटुंबांनी नावाबाबत दिले स्पष्टीकरण : समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासह जातीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा या मुळ गावातील कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिले. या गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन व घर आहे. त्यांचे काका शंकरराव कचरुजी वानखेडे हे सेवानिवृत्त आहेत. ते वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांच्या वडील यांचे मूळ कागदपत्रे पाहिली. त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीचे असल्याचे दिसून आले आहे.
    बुलडाणा जिल्ह्यातील घरात समीर वानखेडे
    बुलडाणा जिल्ह्यातील घरात समीर वानखेडे
  7. 3 कोटी 45 लाख रुपयांचा गांजा पकडला : बुलडाणा जिल्ह्यातून वाशिमच्या रिसोड मार्गावर गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती रिसोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर रिसोड पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता जनावरांचा चारा घेऊन जाणारा टेम्पो पकडला. त्यामध्ये पोलिसांना 11 क्विंटल 50 किलो गांजा आढळला. यात चालकासह अन्य तीन जणांना रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत पकडलेला गांजा 3 कोटी 45 लाख रुपयांचा गांजा व 20 लाख रुपयाचा टेम्पो, असा एकूण 3 कोटी 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास रिसोड पोलीस करत आहेत.
    गांजाचे प्रातिनिधीक छायाचित्र
    गांजाचे प्रातिनिधीक छायाचित्र
  8. 229 विद्यार्थ्यांना झाली होती कोरोनाची लागण : वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेतील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थी व 4 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना झालेले बहुतांश विद्यार्थ्यांचे वय हे 13 ते 15 होते. तसेच बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी, अचलपूर आणि मेळघाट भागातील होते.
    प्रातिनिधीक छायाचित्र
    प्रातिनिधीक छायाचित्र
  9. वाशिमच्या विकास गवळी यांनी ओबीसी आरक्षण दाखल केली याचिका : सर्वोच्च न्यायालयाने वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांची निवडणूक रद्द ठरवली आहे. या पाच जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 27 जुलै, 2018 आणि 14 फेब्रुवारी, 2020 रोजी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याचे कलम 12 (2) (सी) अंतर्गत आरक्षणाची अधिसूचना जारी केली होती. मात्र, या पाच जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिलेले ओबीसी आरक्षण ( OBC Reservation ) 50 टक्क्यांच्यावर जात असल्याचे म्हणत विकास कृष्णराव गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
    विकास गवळी
    विकास गवळी
  10. स्वतःच्या रक्ताने एसटी कर्मचाऱ्याचा मुख्यमंत्र्यांना पत्र : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. वाशिम आगारात वाहक म्हणून गेली दहा वर्षांपासून कार्यरत असलेले रामेश्वर मुसळे हे आंदोलनाच्या 7 व्या दिवशी निलंबित झाले. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले. 'मुख्यमंत्री साहेब आपण सकारात्मक निर्णय घ्यावा', अशी विनंती त्यांनी या स्वतःच्या रक्ताने लिहलेल्या पत्रातून केली होती.
    रक्ताने पत्र लिहिलेले एसटी कर्मचारी

Last Updated : Dec 28, 2021, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.