ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात १६ अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता ४४ उमेदवार निश्चित झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
author img

By

Published : Oct 8, 2019, 3:04 AM IST

वाशिम ­- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात १६ अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता ४४ उमेदवार निश्चित झाले आहेत. रिसोड मतदारसंघातून १६, वाशिम मतदारसंघातून १३ आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातून १५ उमेदवारांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले

रिसोड मतदारसंघात सर्वाधिक १६ उमेदवार निवडणूक लढवणार असल्याने याठिकाणी दोन बॅलेट युनिट(बीयु)ची आवश्यकता आहे. उर्वरित दोन्ही मतदारसंघांमध्ये एकाच बॅलेट युनिटवर मतदान घेतले जाणार आहे. सर्व मतदारसंघांसाठी यापूर्वीच मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. रिसोड मतदारसंघासाठी लागणारे अतिरिक्त बॅलेट युनिट जिल्ह्यात उपलब्ध आहे. लवकरच बॅलेट युनिटचे वितरण करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

हेही वाचा - नागपूर : चोरीच्या संशयातून जमावाने केली मनोरुग्णाला मारहाण

वाशिम जिल्ह्यात १०५२ मतदान केंद्रे असून या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात १ आदर्श मतदान केंद्र व २ सखी मतदान केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. १०५ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेब कास्टिंग होणार आहे, तसेच ७० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नेमले जाणार आहेत.
मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा विविध उपक्रम राबवत आहे. या निवडणुकीत दिव्यांगांचे १०० टक्के मतदान होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले.

Intro:जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून ४४ उमेदवार निवडणूक लढविणार - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

· १६ जणांचे उमेदवारी अर्ज मागे

· रिसोडमध्ये सर्वाधिक १६ उमेदवार रिंगणात

वाशिम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १६ जणांचे अर्ज मागे घेण्यात आल्याने आता ४४ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यामध्ये ३३-रिसोड विधानसभा मतदारसंघातून १६, ३४-वाशिम विधानसभा मतदारसंघातून १३ आणि ३५- कारंजा विधानसभा मतदारसंघातून १५ उमेदवारांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, रिसोड विधानसभा मतदारसंघातून ०९, वाशिम विधानसभा मतदारसंघातून ०३ आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातून ०४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. रिसोड मतदारसंघात सर्वाधिक १६ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने याठिकाणी दोन बॅलेट युनिट (बीयु)ची आवश्यकता भासणार आहे. उर्वरित दोन्ही मतदारसंघांमध्ये एकाच बॅलेट युनिटवर मतदान घेतले जाणार आहे. सर्व मतदारसंघांसाठी यापूर्वीच मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. रिसोड मतदारसंघासाठी लागणाऱ्या अतिरिक्त बॅलेट युनिट जिल्ह्यात उपलब्ध आहेत. लवकरच मतदान यंत्रांची पूरक सरमिसळ प्रक्रिया राबवून त्यापैकी आवश्यक बॅलेट युनिटचे वितरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १०५२ मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किमान आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात १ आदर्श मतदान केंद्र व २ सखी मतदान केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्ह्यातील १०५ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेब कास्टिंग होणार आहे, तसेच ७० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नेमले जाणार आहेत. मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा विविध उपक्रम राबवीत आहे. या निवडणुकीत दिव्यांगांचे १०० टक्के मतदान होईल, यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी सांगितले. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी ते म्हणाले.

वाशिम जिल्ह्यातील निवडणूक लढविणारे उमेदवार (पक्ष) व चिन्ह -

३३- रिसोड विधानसभा मतदारसंघ :अमित सुभाषराव झनक (इंडियन नॅशनल काँग्रेस) - हात, शे. खाजा शे. फरीद (बहुजन समाज पार्टी)- हत्ती, विजयकुमार वामनराव उल्हामाले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)- रेल्वे इंजिन, सानप विश्वनाथ आश्रुजी (शिवसेना)- धनुष्यबाण, दत्तराव भिकाजी धांडे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन) - पतंग, दिलीप रामभाऊ जाधव (वंचित बहुजन आघाडी) -गॅस सिलेंडर, डॉ. प्रशांत गावंडे पाटील (संभाजी ब्रिगेड पार्टी)- शिवण यंत्र, राजेश श्रीकृष्ण अंभोरे (बहुजन विकास आघाडी)- शिट्टी, अनिल रंगराव घुगे (अपक्ष)- हेलिकॉप्टर, अनंतराव विठ्ठलराव देशमुख (अपक्ष) - चावी, चेतन वामनराव इंगळे (अपक्ष) - स्पॅनर, तसव्वरखॉ गुलाम गौसखॉ (अपक्ष) - बॅट, प्रशांत विष्णू बकाल (अपक्ष) - कप आणि बशी, डॉ. राजीव नंदकिशोर अग्रवाल (अपक्ष) - ऑटो रिक्शा, डॉ. राधाकिसन मधुकरराव क्षीरसागर (अपक्ष) - ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, विश्वनाथ तुकाराम शेवाळे (अपक्ष) - कपाट.

३४- वाशिम (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ : दिलीप पांडुरंग भोजराज (बहुजन समाज पार्टी) - हत्ती, डॉ. भारत लक्ष्मण नांदुरे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) - कणीस आणि विळा, सौ. रजनी महादेव राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस) - हात, लखन सहदेव मलिक (भारतीय जनता पार्टी) - कमळ, महादा आश्रु हिवाळे (विदर्भ माझा पार्टी)- दूरदर्शन, राहुल जयकुमार बलखंडे (संभाजी ब्रिगेड पार्टी) - शिवण यंत्र, सिद्धार्थ आकारामजी देवळे (वंचित बहुजन आघाडी) - गॅस सिलेंडर, सौरभ रवींद्र गायकवाड (बहुजन मुक्ती पार्टी)- खाट, संतोष बन्सी कोडीसंगत (प्रहार जनशक्ती पार्टी)- कप आणि बशी, पेंढारकर शशिकांत यशवंतराव (अपक्ष)- अंगठी, भागवत सखाराम रणबावळे (अपक्ष) - कॅमेरा, भालेराव दीपक रमेश (अपक्ष) -ऑटो रिक्शा, सचिन वामनराव पट्टेबहाद्दूर (अपक्ष)- शिट्टी.

३५- कारंजा विधानसभा मतदारसंघ : डहाके प्रकाश उत्तमराव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)- घड्याळ, पाटणी राजेंद्र सुखानंद (भारतीय जनता पार्टी) - कमळ, मो. युसुफ मो. शफी पुंजानी (बहुजन समाज पार्टी) - हत्ती, डॉ. सुभाष पांडुरंग राठोड (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) - रेल्वे इंजिन, आदेश रामभाऊ गवई (बहुजन मुक्ती पार्टी)- खाट, करीम सत्तार शेख (राष्ट्रीय ओलमा कौंसिल)- शिट्टी, पुरुषोत्तम नागोजी ठोंबे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मीस्ट))- बॅट, मनीष दामोदर मोडक (प्रहर जनशक्ती पक्ष)- कपबशी, माणिक महादेवराव पावडे (संभाजी ब्रिगेड पार्टी) - शिवण यंत्र, मुरलीधर लालसिंग पवार (विकास इंडिया पार्टी) - बॅटरी टॉर्च, डॉ. राम शेषराव चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) - गॅस सिलेंडर, कॉ. रामकृष्ण पुंडलिकराव सावके (सी. पी. आय. (एम.एल.) रेडस्टार)- ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, अण्णासाहेब उत्तम रोडगे (अपक्ष)- दूरदर्शन, दिगंबर नरेंद्र चव्हाण (अपक्ष)- जहाज, विनोद पंजाबराव नंदागवळी (अपक्ष)- स्पॅनर.

Body:जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून ४४ उमेदवार निवडणूक लढविणार - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
Conclusion:जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून ४४ उमेदवार निवडणूक लढविणार - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.