वाशिम - जिल्ह्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांकरिता 50 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात अजून एकही रुग्ण नाही. मात्र, येणारा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञही या संभाव्य लाटेसाठी तयार झाले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दुरष्टीने पूर्ण तयारी असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात विरोधकांनी उधळलेली मुक्ताफळे दुर्दैवी - खासदार सुनील तटकरे
आयसीयू बेडची व्यवस्था -
या रुग्णालयामध्ये नवजात शिशुपासून ते लहान मुलांपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांवर उपचार करण्यात येणार आहे. लहान मुलांचे आणि नवजात शिशुंंकरीता येथे आयसीयु बेडची सुविधा उपलब्ध असणार आहे. जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये मध्ये लहानमुला करिता 15 आयसीयु बेड आणि नवजात शिशुकरिता 10 आयसीयू बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच इतर बेड जनरल वार्डात कोरोना बाधित मुलांकरिता दाखल करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेत 15 वर्षाखाली मुलांना कोरोना पॉझिटिव्ह आढळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही तयारी करण्यात येत आहे.
हेही वाचा - धक्कादायक; पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांचे कोरोनाने निधन