वर्धा - हिंगणघाट येथील प्राध्यापिका आणि औरंगाबाद येथील महिला जळीत प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज वर्धा शहरात सर्वपक्षीय मोर्चा व कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मोर्चात शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच सर्वपक्षीय नागरिक, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
LIVE UPDATES -
- 12.28 PM - आरोपीला जिवंत जाळलं पाहिजे, आंदोलकांची मागणी
- 12.21 PM - मोर्चाला सुरुवात
सकाळी 11 वाजता वर्ध्याच्या शिवाजी चौकातून सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. यावेळी मोर्चात काय काळजी घ्यावी, याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
औरंगाबाद जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं. यात महिला 95 टक्के भाजली होती. महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, 95 टक्के भाजल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे