वाशिम - मालेगाव शहरातील नवीन मालेगाव भागातील एका घरात बॅटरीसदृश्य वस्तूचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. मिलिंद बळीराम वानखेडे व भारत तायडे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा - 'राडा' हा शब्द काँग्रेस संस्कृतीला शोभत नाही
मिलिंद वानखेडे हे त्यांची गाडी जुन्या बस स्थानकावर उभी करून काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेले. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीला बॅटरीसदृश्य चार्जिंग वस्तू अडकवून ठेवली. मिलिंद यांना हे माहीत नव्हते. ते तशीच गाडी घेऊन मालेगावात भारत तायडे यांच्या घरी गेले. त्याचवेळी त्यांच्या घरात ती वस्तू कोणी ठेवली, हे पाहिले असता त्याचा अचानक स्फोट झाला.
त्यामध्ये मिलिंद वानखेडे यांच्या दोन्ही हाताची बोटे व तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. तर, भारत तायडे हेदेखील जखमी झाले. मिलिंद वानखेडे यांच्यावर अकोला येथील मिलिंद चौधरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.