वाशिम - जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने टॅक्टरने पेरणी कशी करावी, यासाठी वाशिम तालुक्यातील 62 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत असल्याने शेतकरी पेरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने टॅक्टरने पेरणी कशी करावी, यासाठी आज कृषी सहाय्यकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षित झालेल्या कृषी सहाय्यकांमार्फत वाशिम तालुक्यातील 62 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ यांनी दिली.